Eknath Shinde : मंत्रालयात जाण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, राठोड यांच्याकडून अभिवादन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय राठोड यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे -फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडलं होता. अखेर तो पूर्ण झाला आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांनी काम सुरू होण्यापूर्वी शिवेसनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना आधी बाळासाहेबांचं दर्शन त्यानंतर कामाला सुरुवात करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री दिपक केसरकर, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री संजय राठोड यांनी देखील शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी मंत्री दिपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. ते काय म्हणालेत हे व्हिडीओमधून जाणून घ्या..