आम्हीच विचारांचे वारसदार, शिंदे गटाचं पहिलं पोस्टर पाहिलं का?

| Updated on: Sep 29, 2022 | 12:52 PM

5 ऑक्टोबर रोजीच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जातेय. यासाठीचं पहिलं पोस्टर आज जारी करण्यात आलंय. आम्हीच विचारांचे वारसदार असा मजकूर या पोस्टरवर आहे.

मुंबईः शिवसेना (Shivsena) आमचीच, आम्हीच बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार पुढे नेणारे, असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे. तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) दसरा मेळावा होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजीच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जातेय. यासाठीचं पहिलं पोस्टर आज जारी करण्यात आलंय. आम्हीच विचारांचे वारसदार असा मजकूर या पोस्टरवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्टरवर झळकले आहेत.

Published on: Sep 29, 2022 12:47 PM
“आरएसएसवर बंदी घालण्याची ताकद जगात कोणातही नाही, यापुढेही नसेल”
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांतदादा असं का म्हणाले?