Special Report | बंडखोरांची खरोखर भाऊबंदकी की मग फक्त सुरक्षित खेळी?

| Updated on: Jul 28, 2022 | 10:15 PM

शिंदे गटातले आमदार शहाजीबापूंना काय झाडी, काय डोंगवरुन आव्हान देणाऱ्या मुंबईतल्या नगरसेवक शीतल म्हात्रे सुद्दा नंतर स्वतः शिंदे गटात सामील झाल्या. शिंदे गटाविरोधात राज्यपालांकडे शिवसेनेचं पत्र घेऊन जाणारे उदय सामंतही शिंदे गटात गेले. या साऱ्या बंडखोरीच्या नाट्यानंतर आता भावकीतही फूट पडू लागलीय. जसं शिंदेंनी शिवसेना आमदार जवळ केले, तसं आता ठाकरेंकडूनही बंडखोरांचे निकटवर्तीय जवळ केले जातायत. हे आहेत जळगावच्या पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील. त्यांनीही ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. मात्र किशोर पाटलांच्या बंडखोरीनंतर त्यांना आता घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आता भावबंदकीतही दुही माजलीय. मुंबईत कुठे एक भाऊ शिंदे गटात गेलाय, तर त्याचाच दुसरा भाऊ शिवसेनेतच(Shivsena) आहे. जळगावात एक भाऊ शिंदे गटात गेल्यामुळे त्यांचीच चुलत बहिण शिवसेनेकडून लढण्याची तयारी करु लागलीय. बुलडाण्यात खासदार भावानं शिंदे गटाचा झेंडा हाती घेतल्यामुळे त्यांच्याच बंधूंनी शिवसेनेचा भगवा हाती धरलाय. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर काही ठिकाणी अद्दभूत घडामोडी घडल्या. काही दिवसांपूर्वी ठाकरे आणि शिवसेनेसाठी रडलेल्या रामदास कदमांनी शिंदे गटात गेल्यानंतर
थेट ठाकरेच मराठा नेत्यांना संपवत असल्याची शंका व्यक्त केली. मविआ स्थापनेनंतर मला ठाकरेंमुळे मंत्रीपद मिळाल्याचं सांगणाऱ्या संदीपान भुमरेंनी शिंदे गट स्थापनेनंतर मला शिंदेंमुळेच मंत्री होता आल्याचं सांगितलं.

शिंदे गटातले आमदार शहाजीबापूंना काय झाडी, काय डोंगवरुन आव्हान देणाऱ्या मुंबईतल्या नगरसेवक शीतल म्हात्रे सुद्दा नंतर स्वतः शिंदे गटात सामील झाल्या. शिंदे गटाविरोधात राज्यपालांकडे शिवसेनेचं पत्र घेऊन जाणारे उदय सामंतही शिंदे गटात गेले. या साऱ्या बंडखोरीच्या नाट्यानंतर आता भावकीतही फूट पडू लागलीय. जसं शिंदेंनी शिवसेना आमदार जवळ केले, तसं आता ठाकरेंकडूनही बंडखोरांचे निकटवर्तीय जवळ केले जातायत. हे आहेत जळगावच्या पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील. त्यांनीही ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. मात्र किशोर पाटलांच्या बंडखोरीनंतर त्यांना आता घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

पाचोऱ्यात स्वर्गीय आर. ओ. पाटलांचं प्रस्थ आहे. अनेक वर्ष ते तालुक्यातले शिवसेनेचे नेते होते. सध्या शिंदे गटात गेलेले किशोर पाटील हे आर.ओ.पाटलांचेच पुतणे आहेत. मात्र आता आर.ओ.पाटलांची कन्या आणि किशोर पाटलांच्या चुलत बहिण वैशाली सूर्यवंशींनी लावलेलं बॅनर चर्चेत आलंय.  शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या बंडानंतर त्यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वेंनी शिवसेनेची साथ धरलीय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

घटस्फोटानंतर प्रशांत सुर्वेंनी शिवसेनेकडे तिकीट मागितलं होतं., मात्र तेव्हा ते त्यांना नाकारलं गेलं. म्हणून प्रशांत सुर्वेंनी भावना गवळींविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मतदारसंघात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटात गेल्यामुळे आता जाधवांच्याच भावानं त्यांना आव्हान दिलंय.

एकीकडे खासदार प्रतापराव जाधवांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय., आणि दुसरीकडे त्यांचे बंधू संजय जाधवांनी उद्धव ठाकरेंचा वाढदिवसाचे बॅनर झळकावून थेट आव्हान दिलंय. बुलडाण्यात काही दिवसांपूर्वीच जिल्हाप्रमुखानं पत्रकार परिषद घेऊन सर्व पदाधिकारी शिंदेंसोबत असल्याचं जाहीर केलं होतं.मात्र काही दिवसात इतर काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही ठाकरेंकडेच असल्याचं जाहीर केलं. मुंबईचे माजी महापौर राहिलेले दत्ता दळवींचे पुत्र योगेश दळवींनी शिंदे गटात प्रवेश केलाय.

मात्र अद्याप दत्ता दळवी हे शिवसेनेतच आहेत. योगेश दळवी हे याआधी युवासेनेचे पदाधिकारी होते. आणि दत्ता दळवी हे संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांच्या विक्रोळी मतदारसंघात ३ वेळा शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. मात्र आता वडिल शिवसेनेत आहेत आणि मुलगा शिंदे गटात गेलाय. आता ही खरोखर बंडाळीनंतरची भावबंदकी आहे. की मग शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात राहण्याची सुरक्षित खेळी. हे वेळच सांगेल कारण, कोर्टाच्या निकालानंतर तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांचाही फैसला होणाराय. कोर्ट काय निकाल देतं, आणि त्यानंतर कोण कुणाकडे थांबतं, ते पाहणंही महत्वाचं असेल.

Published on: Jul 28, 2022 10:15 PM
Kalicharan Maharaj : वादग्रस वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजचे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबाबत खूप मोठं वक्तव्य
Pune -Deep Amavasya | पुण्यात म्हसोबा मंदिरासमोर दीप अमावस्या साजरी