Hemant Patil | एकनाथ शिंदेचा नांदेड दौरा
त्याचबरोबर एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. पण त्यापूर्वीच शिवसेनेत मोठी खिंडार पडली . कालपर्यंत निष्ठावंत म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारे अनेक शिलेदार आज अचानक शिंदे गटात सहभागी झाले. नांदेड मधील दोन जिल्हा प्रमूख उमेश मुंडे , आनंद बोंढारकर यांच्यासह तब्बल दहा तालुका प्रमुखानी पदाचा राजीनामा देत आज शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली . हे सर्व बंडखोर उद्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तिथं अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
Published on: Aug 08, 2022 10:03 AM