Eknath shinde : कडेकोट सुरक्षेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रवाना
एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा(Police) मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच त्यांच्या सोबतही सुरक्षेसाठी पोलीस दलाचा ताफाही मोठ्या हजार असलेला दिसून आला आहे
मुंबई – बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Ekanath Shinde)आपल्या बंडानंतर म्हणजेच तब्बल नऊ दिवसानंतर मुंबई मध्ये दाखल झाले आहेत. मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला होता. शिंदे आज देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. सत्ता स्थापनेबाबत या दोघांच्यामध्ये चर्चाही होणार आहे . एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा(Police) मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच त्यांच्या सोबतही सुरक्षेसाठी पोलीस दलाचा ताफाही मोठ्या हजार असलेला दिसून आला आहे