‘कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना…,’ काय म्हणाले एकनाथ शिंदे

| Updated on: Oct 05, 2024 | 3:26 PM

वाशीम येथे बंजारा समाजाचा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक योजनांचे उद्घाटन झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांचेही भाषण झाले. आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली देश महाशक्ती होणार असल्याचे सांगितले.

Follow us on

वाशीम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामाचे लोकार्पण करण्यात आहे. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी यांचे कौतूक केले. ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी नुकताच परदेश दौरा केला. तेथे जागतिक नेत्यांनी मोदी यांचे ज्या प्रकारे स्वागत केले ते पाहून भारताला महाशक्ती बनण्यापासून कोणी आता रोखू शकणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजना सुपर हीट झाली आहे.खरे तर आपले सरकारचे लाडके सरकार झालेले आहे. ही योजना कोणी माई का लाल बंद करु शकणार नाही असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आजच्या या कार्यक्रमासाठी बंजारा समाज एकत्र आला आहे. ‘बंजारा विरासत’चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले आहे.सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा,असा हा दिवस आहे.रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, की पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावं. पण तो इतर कुणाच्या नशिबात योग आला नाही.आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नशिबात तो योग होता. मोदीजी इथं आले आणि त्यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.