…पण त्यांचे पाय खाली थरथरत होते; राऊतांची शिवसेनेच्या नेत्यावर टीका
दादा भूसेंच्या दाढीला आग लागण्याचं कारण नव्हते. मोठ्या आवेशात ते विधिमंडळात बोलत होते पण त्यांचे पाय खाली थरथरत होते.
नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्टीकरण देत खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल केला होता. त्यावर आत संजय राऊत यांनी कडक उत्तर देत आधी निवृत्ती घ्या आणि मग चौकशीला सामोरं जा असं म्हटलं आहे.
मंत्री दादा भूसे यांच्या गिरणा एग्रो कंपनीने 175 कोटी शेतकऱ्यांकडून गोळा केले आणि प्रत्यक्षात दीड कोटी दाखवण्यात आले. दादा भूसेंच्या दाढीला आग लागण्याचं कारण नव्हते. मोठ्या आवेशात ते विधिमंडळात बोलत होते पण त्यांचे पाय खाली थरथरत होते. दाढीला घाम फुटला होता अशा शब्दात संजय राऊतांनी भूसेंवर टीका केली. तर शेतकऱ्यांच्या पैशांचा हिशोब आम्ही मागतोय तो द्यावाच लागेलं असंही राऊत म्हणाले.
Published on: Mar 24, 2023 01:17 PM