दोन महिन्यामध्ये शिंदे दिसणार नाहीत, भाजपवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य
दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीत एका सभेमध्ये केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
Prakash Ambedkar : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार होताना दिसत आहेत. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत.निवडणूक संपल्यानंतर जस कामं संपतं तसं एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बि.डी. चव्हाण यांच्या प्रचारावेळी बोलत असताना केलं आहे.
Published on: Apr 20, 2024 09:51 AM