इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका

| Updated on: Mar 02, 2024 | 6:11 PM

अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. ऐनवेळी अन्य मंत्री आणि सहकाऱ्यांनी हस्तक्षेप करुन हा वाद सोडवला. यावरुन संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांत गॅंगवॉर सुरु झाले असल्याची जोरदार टीका केली आहे.

Follow us on

मुंबई | 2 मार्च 2024 :  विधानभवनात सत्ताधारी शिवसेना पक्षाचे मंत्री दादा भुसे आणि त्यांचेच आमदार यांच्यात धक्काबु्क्की आणि शाब्दीक चकमक झडल्याप्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करीत हे दोन गॅंगमधील गॅंगवॉर असल्याचे म्हटले आहे. मोदी शब्दाला विकास हा पर्यायी शब्द झाल्याचे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा की आरोपींना भाजपात घेऊन त्यांना भ्रष्टाचार संपवायचा आहे का? त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना विकासाची व्याख्या बदलायला सांगावी अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावणार नाही अशा शपथा ते घेतात आणि आता त्याच अजित पवारांच्या पाठोपाठ नवाब मलिकांना सोबत घेतात असेही राऊत यांनी म्हटले आहे. अजित पवार यांचा शिखर बॅंक घोटाळा, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळ्याबद्दल मोदी काय बोलले होते आणि आता भाजपाच्या वॉशिंग पावडरमध्ये धुतल्यानंतर त्यांचा भ्रष्टाचार मुक्त होतो असेही ते म्हणाले. इलेक्शन कमिशनने प्रचारात धर्म, जात किंवा धार्मिक स्थळांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे यावर प्रश्न विचारला असता राऊत यांनी आपला इलेक्शन कमिशनवर विश्वास राहीला नाही. ते मोदी-शाह कमिशन बनले आहे. कर्नाटकात त्यांनी बजरंगबलीच्या नावाने मते मागितली होतीच ना ? पुलावामाच्या नावावर कोणी मते मागितली, युपीत रामाच्या नावावर कोण मत मागणार ? म्हणजे नियम केवळ आमच्यासाठी आणि हे नियम तोडणार काय ? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे ते शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार कमळावरच लढतील, त्यांना कमळाबाईंनी ठेवलेले आहे असा टोला त्यांनी लगावला. कारण, चोरलेल्या पक्षांसोबत मते चोरता येत नाहीत ना ? असेही राऊत म्हणाले.