Bhandara : पथदिवे लावताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू
विजेच्या धक्क्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहाडी (Mohadi) तालुक्यातील आंधळगावमध्ये घडली आहे. हा तरुण ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याचा काम करायचा.
भंडारा: विजेच्या धक्क्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहाडी (Mohadi)तालुक्यातील आंधळगावमध्ये घडली आहे. हा तरुण ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याचा काम करायचा. पथ दिवा लावताना विजेचा धक्का बसला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 22, 2022 09:20 AM