state electricity : राज्याला वीज दरवाढीचा झटका? महावितरणची काय मागणी?
दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे. इतकी प्रचंड मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षांत प्रथमच करण्यात आलेली आहे.
मुंबई : राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा झटका देण्याची तयारी महावितरणने ( MAHAVITARAN )सुरु केली आहे. महावितरणने युनिटमागे २ रुपये २५ पैसे वीज दरवाढ करण्याबाबत राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
या याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये ६७ हजार ६४४ कोटी रुपये तूट भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मागणी, वीज आणि वहन या तिन्ही आकारांत वाढीची मागणी आहे. त्यामुळे दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे. इतकी प्रचंड मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षांत प्रथमच करण्यात आलेली आहे.
Published on: Jan 28, 2023 08:24 AM