जोडे बनवणारा प्रकल्प बाहेर गेला हे पाप फडणवीस यांचे, सुषमा अंधारे यांची खरमरीत टीका

| Updated on: Apr 28, 2023 | 2:33 PM

नाइकी, आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन ही कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होती. मात्र 2300 कोटी गुंतवणुकीचा आणि 20 हजार युवांना रोजगार देणारा प्रोजेक्ट तमिळनाडू सरकारने नेला.

मुंबई : राज्यातील वेगवेगळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रकल्प, उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याने महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले, त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करत आहेत. नाइकी, आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन ही कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होती. मात्र 2300 कोटी गुंतवणुकीचा आणि 20 हजार युवांना रोजगार देणारा प्रोजेक्ट तमिळनाडू सरकारने नेला. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी अच्छा किया तो हमने किया बुरा किया तो नेहरू गांधी ने ही कँसेट पंतप्रधान मोदी केंद्रात तर अच्छा किया तो शिंदे-फडणवीस ने बुरा किया तो ठाकरे ने अशी वाजवली जाते असे म्हटलं आहे. तर 2300 कोटी गुंतवणुकीचा जोडे बनवणारा प्रकल्प बाहेर गेला हे पाप फडणवीस यांचे आहे. राज्यात येणारा प्रकल्प हा बाहेर जातोय हा कुणाचा नाकारतेपणा आहे असा सवाल केला आहे.

Published on: Apr 28, 2023 02:33 PM
नितेश राणे आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत, पक्ष बदलला की भूमिका बदलली!; कुणाचा घणाघात?
भाजपने कृत्रिम पद्धतीने महागाई वाढवली; काँग्रेसच्या नेत्याचा सरकारवर निशाणा