Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्र पिंजूनही आमदारांची संख्या 60च्यावर नाही, बावनकुळे यांनी पवारांवर साधला निशाणा

| Updated on: Aug 30, 2022 | 5:16 PM

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्र पिंजूनही आमदारांची संख्या 60च्यावर नाही, असा निशाणा बावनकुळे यांनी पवारांवर साधला आहे.

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्र पिंजूनही आमदारांची संख्या 60च्यावर नाही, असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर साधला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याचा श्रीगणेशा ठाण्यात सुरु होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी शरद पवार यांनी यापूर्वी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. पण त्यांना पक्षाच्या आमदारांची संख्या 60 च्यावर नेता आलेली नसल्याचा टोला हाणला. तसेच पवार ज्या ज्यावेळी सत्तेत आले. त्यांनी इतर पक्षांच्या जागा कमी केल्या अथवा तो पक्षच कमकवूत केल्याचा आरोप ही त्यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांनी आज भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राजकीय घडामोडींवर भाष्य केले. राज ठाकरे हे उमदे नेते असून प्रखर हिंदुत्वासाठी ते प्रामाणिकपणे काम करत असल्याची पोचपावती ही त्यांनी देऊन टाकली.

Published on: Aug 30, 2022 05:16 PM
बाप्पाच्या आगमनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज ; दोन लाखाहून अधिक भाविक जिल्ह्यात दाखल
Bhaskar Jadhav | गणेशोत्सवात गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या, शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांचे आवाहन