बरंच काही बोलूनही खासदार अरविंद सावंत म्हणतात मी काय बोललो नाय बरं

| Updated on: Jan 14, 2023 | 4:12 PM

ठाणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( ADITYA THACKAREY ) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKANTAH SHINDE ) यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात बाईक रॅली काढली. यानंतर त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत (MP ARVIND SAWANT ), खासदार राजन विचारे ( MP RAJAN VICHARE ) उपस्थित होते. ठाण्यात मेळावा होत असल्याने […]

ठाणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( ADITYA THACKAREY ) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKANTAH SHINDE ) यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात बाईक रॅली काढली. यानंतर त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत (MP ARVIND SAWANT ), खासदार राजन विचारे ( MP RAJAN VICHARE ) उपस्थित होते.

ठाण्यात मेळावा होत असल्याने खासदार अरविंद सावंत यांनी ही संधी सोडली नाही. ठाण्यात इतकं काही घडलं तरी खासदार राजन विचारे समर्पित भावनेने शिवसेनेसोबाबत उभे राहिले. जीवनात उभी राहिलेली माणसं विसरून गेली की आपणाला कुणी उभं केलं. पण, ज्यांनी त्यांना उभं केले ती शिवसेनेसोबतच प्रामाणिकपणे आहेत असे ते म्हणाले.

व्यासपीठावर यावेळी ठाण्याचे पहिले उपमहापौर उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहून अरविंद सावंत म्हणाले, त्यांचं नाव नरेश आहे बरं! एक हे नरेश आणि दुसरे ते नरेश. ये नरेश सच्चा है, दुसरा नरेश… मी काही बोलत नाही बरं.. जो सच्चा हैं वो तुम्हारे साथ रहेगा असे म्हणत त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर निशाणा साधला.

Published on: Jan 14, 2023 03:57 PM
नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, कोणी केला फोन?
सत्यजित तांबे यांच्यासमोर आधी आव्हान आणि आता नवा आरोप