video | ‘धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड, तर गुन्हे दाखल करु…,’ लोढा यांनी स्पष्टच सांगितले

| Updated on: Mar 02, 2024 | 3:13 PM

धर्मांतर केलेले हे विद्यार्थी आयटीआय प्रशिक्षणार्थी म्हणून आदिवासी सवलतींचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत आणखी पुरावे शोधणे सुरु आहे. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

मुंबई | 2 मार्च 2024 : आदिवासी समाजातून धर्मांतर केल्यानंतरही आदिवासींच्या सवलती लाटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात नागपूर अधिवेशनात चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या समितीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.या समितीच्या चौकशीनंतर एकूण 257 जणांनी धर्मांतरानंतरही सवलती घेतल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे आदिवासीच्या हक्कावर गदा आली असून त्यांना याचा फटका बसल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. या 257 प्रकरणात आपण कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. या केसमध्ये आणखी पुरावे सापडल्यास पोलिसांकडे गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

Published on: Mar 02, 2024 03:11 PM
Video | ठाण्याच्या जांभळीनाका येथे या तारखेला राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार
Video | छत्रपती संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?