देवच काय महापुरुषही बॅचलर नाही, हे धक्कादायक विधान कुणाचं?
माणसाचा जन्म स्पर्मपासून होतो. स्पर्म दिसत नाही पण 100 किलोचा माणूस तयार करतो. माणूस निर्माण करणाऱ्याने सगळी माणसे वेगळी बनवली आहेत.
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( CHANDRAKANT PATIL ) यांनी पुण्यात ( PUNE ) एका कार्यक्रमात बोलताना एक मिश्किल टिपण्णी केलीय. पूर्वी मुले मुलीची टिंगल करायचे. आता मुली मुलांची टिंगल करतात असं ते म्हणालेत.
काही ना काही विधानांमुळे चर्चेत असणारे चांद्रकांत पाटील यांनी याच कार्क्रमात देवदेवता यांच्याबद्दलही एक विधान केलंय. खरं तर या विधानावरून त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.
इंग्रज आले, डच आले, आपल्याला काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील हाल केले.आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळं करता येते. सेवादेखील करता येते असे ते म्हणाले आहेत. याचसोबत ते काय म्हणालेत ऐका…
Published on: Jan 13, 2023 04:54 PM