Chandrakant Patil : राज्यात सर्वकाही सुरळीत, जनतेची चिंता सोडा, चंद्रकांत पाटलांचा निशाणा कुणावर?

| Updated on: Sep 10, 2022 | 8:55 PM

एवढेच नाहीतर महाविकास आघाडी काळातील सर्वच पेंडींग विषय ते आता पूर्ण करीत आहेत. आता तर त्यांच्या जोडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर जनतेच्या संपर्कात आहेत. शिवाय गेल्या अडीच महिन्याच्या काळात त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांचा मूळ स्वभाव हा जनतेला भेटणे, प्रवास करणे असाच आहे. त्यामुळे राज्याची चिंता सोडा त्यासाठी राज्य सरकार हे तत्पर असल्याचेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे.

मुंबई : राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असल्याचा खोचक टोला (Supriya Sule) खा. सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला होता. यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कार्यप्रणालीच समोर मांडली आहे. (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रशासन संभाळून जनतेचा संपर्क ठेवला होता. त्यामुळे त्यांना नव्याने काही सांगण्याची गरजच नाही. शिवाय ते राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. दरम्यानच्या काळात जनतेला कोणत्या समस्यांना सामोरेच जावेच लागले नव्हते. एवढेच नाहीतर (MVA) महाविकास आघाडी काळातील सर्वच पेंडींग विषय ते आता पूर्ण करीत आहेत. आता तर त्यांच्या जोडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर जनतेच्या संपर्कात आहेत. शिवाय गेल्या अडीच महिन्याच्या काळात त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांचा मूळ स्वभाव हा जनतेला भेटणे, प्रवास करणे असाच आहे. त्यामुळे राज्याची चिंता सोडा त्यासाठी राज्य सरकार हे तत्पर असल्याचेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे.

Published on: Sep 10, 2022 08:55 PM
Varun Sardesai : बंडखोरांजवळ एकच पर्याय..! आदित्य ठाकरेनंतर वरुण सरदेसाईने शिंदे गटाला सुनावले
Arvind Sawant : भाजप हा भेकडांचा पक्ष, अरविंद सावंतांनी उदाहणासहीतच सांगितले