EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत

| Updated on: Jun 16, 2024 | 3:23 PM

टेस्लाचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) संदर्भात नवीन वाद सुरू केला आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटचा दाखला देत राहुल गांधींचे EVMवर उपस्थित केले प्रश्न

EVM Hack: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) संदर्भात नवीन वाद सुरू केला आहे. एलॉन मस्क म्हणाले की, निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर थांबवला पाहिजे कारण ते हॅक होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या या विधानामुळे भारतात निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या वापराबाबत वादाला तोंड फुटले आहे. या विधानावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

 एलॉन मस्क यांच्या ट्विटमध्ये काय?

एलॉन मस्क यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रद्द केली पाहिजे कारण मानव किंवा AI हॅक होण्याचा धोका अजूनही खूप जास्त आहे.

 

Published on: Jun 16, 2024 03:20 PM
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फेरबदलाची शक्यता, काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होणार बदल-सूत्र
कोकणात महायुतीतच बॅनर वॉर… बाप, कुत्ता, झुंड अन् हिसाब; नेमके काय झळकले बॅनर?