भाजपा 10 लाख लोकांचा पाठींबा गमावणार? बावनकुळेंकडे निवेदन जाणार
या संदर्भात आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी एक वाजता माजी सैनिकांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर भाजप माजी सैनिक आघाडी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
योगेश बोरसे, पुणेः राज्यातील 10 लाख लोकांचा पाठींबा भाजप (BJP) गमावणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील माजी सैनिक भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असतांनाही सैनिकांच्या प्रश्नांकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी सैनिक आघाडीने (Sainik Aghadi) केला आहे. भाजपाशी संलग्न असणारी माजी सैनिक आघाडी पक्षातून बाहेर पडली तर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण यात 10 लाख आजी-माजी सैनिकांचा समावेश असून त्यांच्या कुटुंबियांद्वारेही भाजपाला डावलले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पाठीशी आमचा परिवार खंबीरपणे उभा आहे. पण कोणतेही प्रश्न सुटलेले नाही. त्यामुळे भाजपमधून बाहेर पडणार असल्याची माहिती भाजप माजी सैनिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नारायण अंकुशे यांनी दिली. या संदर्भात आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी एक वाजता माजी सैनिकांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर भाजप माजी सैनिक आघाडी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.