Breaking | राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी 24 जूनपर्यत मुदतवाढ

| Updated on: Jun 18, 2022 | 1:05 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी आता 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कमाल संधी पूर्व परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी आता 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कमाल संधी पूर्व परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससी कडून शुक्रवारी परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहिर करण्यात आली आहे. आता परिक्षेला अर्ज 24 जून पर्यंत करता येणार आहे.  आयोगाच्या संधीसंदर्भातील तरतुदीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी अर्ज करता आला नव्हता. विद्यार्थ्यांना ही परिक्षा देता यावी म्हणून आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटी तारीख 24 जून 2022 रात्री 12 वाजे पर्यंत आहे. जाहिरातीतील इतर अटी व शर्ती मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Published on: Jun 18, 2022 01:05 PM
Sanjay Raut : अग्निपथ योजनेवरुन संजय राऊतांची केंद्रावर टीका, ही आग वाढतच जाणार, संजय राऊतांचा इशारा
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 18 June 2022