देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा कुणाचा होता? पटोले कोणाला टोला

| Updated on: May 03, 2023 | 1:12 PM

पटोले यांनी हे सरकार स्थापन होत असताना कोण कसं वागतं होतं यावर आत्ता बोलणार नाही. तर स्थापनेवेळी कोणी पांठीबा दिला आणि ते पडताना काय झालं हे अख्खा देश पाहत होता असं म्हटलं आहे.

Follow us on

मुंबई : पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली आहेत आता हा विषय पुन्हा एकदा चर्चीला जात आहे. या शपथविधी आणि पहाटेच्या सरकारवरून काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. यावेळी पटोले यांनी हे सरकार स्थापन होत असताना कोण कसं वागतं होतं यावर आत्ता बोलणार नाही. तर स्थापनेवेळी कोणी पांठीबा दिला आणि ते पडताना काय झालं हे अख्खा देश पाहत होता असं म्हटलं आहे. आम्ही यांच्या सत्तेच्या वाटेत नव्हतो. पहाटेच्या नव्हतो आणि कुठल्याच नव्हतोच. कॉमन मिनिमन प्रोग्राम तयार करण्यात आला होता. तर आमच्या पक्षात लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. आम्ही यांच्याकडे आलो नव्हतो तर ते आमच्याकडे आले होते. सोनिया गांधी यांच्याकडे आले होते. त्यामुळं कोणाच्या मध्यस्थीने झाला? आम्ही सत्तेसाठी नव्हतो असा घणाघात केला आहे. तसंच, ‘पहाटेचं सरकार आलं. राज्याला कलंक लावण्याचे काम झाले हे महाराष्ट्राने बघितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा कुणाचा होता. पहाटेच सरकार कुणाचं होतं हेही माहीत आहे’, असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला आहे.