छत्रपती संभाजी महाराजांवरून फडणवीस यांचा अजित पवार यांच्यावर घणाघात; म्हणाले, ते धर्मवीरच
फडणवीस यांनी अजित पवार यांना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच म्हणत ठणकावलं आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज रक्षक म्हणायला कोणाचीच हरकत नाही. पण ते धर्मवीर नाहीत हे म्हणणं हे त्यांच्या विचारांशी द्रोह असल्याचेही म्हटलं आहे.
मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून सुरू झालेल्या वादावर काल आपलं स्पष्ट मत सांगितलं . तसेच त्यांनी त्यावेळी कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणा पण आपण छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षकच म्हणणार असे त्यांनी सांगितलं. त्यांना धर्मवीर म्हणणे म्हणजे त्यांच्या विचारांशी द्रोह करण्यासारख असल्याचंही अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षेप घेतला.
अजित पवार यांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर फडणवीस यांनी परत एकदा हल्लाबोल केला. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणे म्हणजे त्यांच्या विचारांशी द्रोह असं म्हटलं होतं. त्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे.
यावेळी फडणवीस यांनी अजित पवार यांना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच म्हणत ठणकावलं आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज रक्षक म्हणायला कोणाचीच हरकत नाही. पण ते धर्मवीर नाहीत हे म्हणणं हे त्यांच्या विचारांशी द्रोह असल्याचेही म्हटलं आहे.