Devendra Fadnavis | बदलणारी भाषा नसते ती बोली असते. त्यात गोडवा असतो…: फडणवीस
मराठी तितुका मेळवावा - विश्व मराठी संमेलन उद्घाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. तसेच फडणवीस यांनी मराठी भाषा ही बदलत नाही तर त्याची बोली बदलते. पण हा बदल असूनही त्यात गोडी असल्याचे फडणवीस म्हणाले.
मुंबई : मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित मराठी तितुका मेळवावा – विश्व मराठी संमेलन उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. तसेच यावेळी फडणवीस यांनी मराठी भाषेबद्दल भरभरून बोलले.
फडणवीस यांनी मराठी भाषा ही बदलत नाही तर त्याची बोली बदलते. पण हा बदल असूनही त्यात गोडी असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच मराठी ही केवळ भाषा नसून तो एक विचार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तर आपल्या या भूमीण आपल्या या देशाला भरभरून दिलं आहे. भारत मातेही अभिमान दिला आहे. मराठी टिकेल का विचारणाऱ्याला आपण मराठीसाठी काही करणार का असा सवाल करायला पाहिजे. तर मराठी भाषा आपल्या पुढच्या पिढीपर्यत गेली पाहिजे. काहींना केवळ काहींना उणी-दुणी काढण्याची सवय असल्याचा टोला ही देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.