विरोधकांच्या पत्रावर फडणवीस यांची खोटक टीका; म्हणाले, ‘पत्राऐवजी ग्रंथ दिलाय’
त्याला विरोधकांनी विरोध करत त्यावर बहिष्कार टाकला. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
मुंबई, 17 जुलै 2023 | राज्यात आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. त्याच्याआधी काल सायंकाळी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याला विरोधकांनी विरोध करत त्यावर बहिष्कार टाकला. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. याचदरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतना जोरदार निशाना साधला. यावेळी सरकारला विरोधकांनी दिलेल्या पत्रावरून जोरदार टीका केली. यावेळी फडणवीस यांनी, अधिवेशनात आम्ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करु, न्याय देण्याचा प्रयत्न करु. मात्र विरोधी पक्ष हा अजूनही विरोध करण्याच्या मानसिकतेतच दिसत आहे. एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीच्या मंदिराने दिलेल्या निर्णयाला मानायचं नाही हा प्रकार योग्य नाही. हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे. त्यामुळे सरकारला बेकायदेशीर म्हणणे चुकीचे आहे. तर विरोधकांनी पत्र देण्याऐवजी ग्रंथच लिहीला, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.