Anil Bonde on Fadnavis | ‘उप’ ही लवकरच निघून जाईल, फडणवीसच होणार मुख्यमंत्री? काय आहेत डॉ. बोंडे यांचे संकेत?
Anil Bonde | सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे उप मुख्यमंत्री असले तरी ते लवकरच राज्याचे निर्विवाद नेतृत्व करतील असे सूतोवाच खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
Anil Bonde | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर सध्या उप मुख्यमंत्री असले तरी ते लवकरच राज्याचे निर्विवाद नेतृत्व करतील असे सूतोवाच खासदार डॉ. अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर येत आहे. तर सततच्या या वक्तव्यांमुळे शिवसेनेची धार तीव्र होत असून शिंदे गटाची (Shinde Group) चिंता वाढत आहे. फडणवीस हे महाराष्ट्राचे निर्विवाद नेतृत्व आहे. ते दमदार पाऊल टाकतात. ते तातडीने निर्णय घेतात. त्यांच्या माध्यमातून ओबीसींसाठी (OBC) स्वतंत्र विभाग सुरु झाला. मराठ्यांना ही त्यांच्याच काळात आरक्षण मिळालं. आदिवासींसाठी त्यांनीच कामं केलं. भाजपचं सरकार गेल्यानंतर मात्र महाविकास आघाडी काळात या सर्व सवलती आणि तरतूद बंद झाल्याचा आरोप डॉ. बोंडे यांनी केला.
तोंडाला हात कोण लावणार?
आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला हात कोण लावणार, असे सूचवत स्वतःचे घर स्वस्तःच सांभाळायचे असते असा टोला डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेनेचा उल्लेख न करता लगावला. भाजप नेहमीच शिवसेनेसोबत राहण्याच्या प्रयत्नात होती. शिवसेना भाजपने फोडण्याच्या आरोपात कसलं तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.