हेलिकॉप्टरमधून उतरताच वेगवेगळ्या कारने कार्यक्रमाला रवाना, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंवर नाराज?
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगच आहेच.
पालघर: गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगच आहेच. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत. दोन्ही नेते एकाच हेलिकॉप्टरमधून आले, परंतु एकाच गाडीत जाण्यास देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिली. यामुळे फडणवीस नाराज आहेत का? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. कार्यक्रमास शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक उपस्थित आहेत.
Published on: Jun 15, 2023 02:38 PM