Devendra Fadnavis | बैठकीत सकारात्मक चर्चा, कर्मचाऱ्यांचा संपही मागे : देवेंद्र फडणवीस
यावेळी फडणवीस यांनी महावितरणच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचं नाही. तर पुढील तीन वर्षात 50 हजार कोटींची गुंतवणूक करायची असल्याचे ही ते म्हणाले
मुंबई : महावितरण कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता. त्याप्रमाणे राज्यभर या संपाला सुरुवातही झाली. तर या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली. त्याप्रमाणे यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे आणि तोडगा निघाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि उर्जामंत्री यांनी राज्यातील विविध 31 संघटनासोबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. त्याप्रमाणे तोडगा निघाला.
यावेळी फडणवीस यांनी महावितरणच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचं नाही. तर पुढील तीन वर्षात 50 हजार कोटींची गुंतवणूक करायची असल्याचे ही ते म्हणाले.