फडणवीसांनी OBC आरक्षणावर बोलू नये, Nana Patole यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका-TV9

| Updated on: May 21, 2022 | 8:48 PM

फडणवीस यांना ओबीसी आरक्षणा बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तर मलिक यांचा राजीनामा घ्यायचा की नाही यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असे नाना पटोले म्हणाले.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) भाजपकडून ओबीसी आरक्षणावरून घेरण्यात येत आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्यावरूनही जोरदार घमासान सुरू आहे. नवाब मलिक (Nawab Malik)यांचा दाऊदशी संबंध आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून होत असून मलिकांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर आता नाना पटोले (Nana Patole) यांनी पलट वार करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. तसेच फडणवीस यांना ओबीसी आरक्षणा बोलण्याचा नैतिक अधिकार ही नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा की नाही यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: May 21, 2022 08:48 PM
जे सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधींना सुचलं नाही ते नानांना सुचलं- अनिल बोंडे
Ramdas Athawale on Sambhajiraje | संभाजीराजेंनी हरण्यासाठी निवडणूक लढू नये