…जर धमकी देत असेल तर…, राष्ट्रवादी आक्रमक; मिटकरी यांनी दिला थेट इशाराच
शिवपुत्र संभाजी नाटकाचे पास दिले नाही तर याचे सादरीकरण कसे होते, हे बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप कोल्हे यांनी केला.
अकोला : प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग काल पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे पोलिसांकडून बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर शिवपुत्र संभाजी नाटकाचे पास दिले नाही तर याचे सादरीकरण कसे होते, हे बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप कोल्हे यांनी केला. त्यावरून आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट त्या पोलिसावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील काय? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच जर त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई नाही केली. तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे.