शेतकऱ्याने करायचं तरी काय? कशालाच दर नाही, आत्ता शेतकऱ्यांच्या निराशेचं कारण कोणतं पीकं?
तर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष मोठे निराशेचे राहिले आहे. सातत्याने घटत चाललेल्या दरामुळे शेतकरी हताश झाला आहे. मागील 20 दिवसापासून सोयाबीन पिकांचे दर स्थिर असून 4800 ते 5000 दरम्यान राहिले आहे.
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्याच्या कांदा पिकासह इतर पिकांच्या पडलेल्या दरामुळे चांगलाच फटका बसत आहे. यामुळे शेतकरी हवालदील होताना दिसत आहे. तर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष मोठे निराशेचे राहिले आहे. सातत्याने घटत चाललेल्या दरामुळे शेतकरी हताश झाला आहे. मागील 20 दिवसापासून सोयाबीन पिकांचे दर स्थिर असून 4800 ते 5000 दरम्यान राहिले आहे. सोयाबीनला चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन साठवून ठेवले. मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. खरीप पेरणीचा हंगाम जवळ आलेला असतांना शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदी करायची आहेत. शेतीच्या मशागतीसाठी खर्च लागत असून त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात आणत आहेत. मात्र पेरणी पूर्वी खते, बियाणे खरेदी करण्याच्या तोंडावर सोयाबीन दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.