मग तुमच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही कसा? आव्हाड यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला

| Updated on: Mar 31, 2023 | 8:36 AM

सर्वोच्च न्यायालयाने राज्याबद्दल काय म्हटले? हे सरकार नपुंसक आहे. जाती धर्मात तेढ लावून आपले हित साध्य करायचे काम करत आहे.

नाशिक : येथील सिन्नर तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे उपस्थिती होते. यावेळी आव्हाड यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या नपुसंक टिपणीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याबद्दल काय म्हटले? हे सरकार नपुंसक आहे. जाती धर्मात तेढ लावून आपले हित साध्य करायचे काम करत आहे. वर मोदीसाहेब, खाली शिंदे-फडणवीस साहेब हिंदुत्ववादी आहेत. तुमच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही असे कसे? असा सवाल आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला. तर राज्यात निघणारे हिंदू मोर्चे हे फक्त हिंदूंना भडकवण्यासाठी निघतात का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर पुन्हा व्यवस्थित राज कारभार हवा असेल तर हे राज्य आमच्या हातात द्या असेही ते म्हणाले.

Published on: Mar 31, 2023 07:28 AM
शिंदे-फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाकडून निधी वाटपावरुन मोठा झटका
तानाजी सावंत आणि नवनीत राणांवर सुषमा अंधारेंची टीका