शेतकऱ्यांचा मागण्या मान्य होणार आहे का? आज सरकारसोबत बैठक

| Updated on: Mar 16, 2023 | 9:42 AM

याच्याआधी शहापूर तहसील कार्यालयात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे मंत्री अतुल सावे यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली होती.

मुंबई : शेतकरी त्यांच्या विविध मागण्या घेऊन मुंबईकडे कूच करत आहेत आणि त्यावर तोडगा निघावा म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसान सभेचे नेते यांच्यात बैठक होणार आहे. याच्याआधी शहापूर तहसील कार्यालयात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे मंत्री अतुल सावे यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली होती. यावेळी शेतकरी शिष्ट मंडळ जवळपास 40 ते 50 टक्के समाधान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा अशी मागणी शिष्टमंडळाची होती. त्यानुसार आज बैठक होत आहे. त्याचबरोबर जर आज तोडगा नाही निघाल्यास हा मोर्चा मुंबईला धडकणार आहे. तर याबैठकीत आज तोडगा निघणार की नाही यावर राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रामध्ये 17 मार्चपर्यंत गारपीटीचा अंदाज
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस; 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन