धुळ्यात अवकाळी पावसामुळे 56 गावं बाधित
धुळ्यातही अवकाळी पावसामुळे अनेकांना फटका बसला असून जिल्ह्यातील सुमारे 56 गावे बाधित झाली आहेत.
धुळे : राज्यातील शेतकरी अवकाळीमुळे त्रस्त झाला आहे. तर अवकाळीमुळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. धुळ्यातही अवकाळी पावसामुळे अनेकांना फटका बसला असून जिल्ह्यातील सुमारे 56 गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यांतील 861 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. गहू, कांदा, हरभरा, मका, ज्वारी सह पपई केळीच्या बागांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. यामुळे 56 गावातील पंधराशे हून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. अवकाळीचा सर्वाधिक फटका शिंदखेडा तालुक्याला बसला आहे.
Published on: Mar 17, 2023 08:34 AM