Sharad Pawar | शरद पवारांच्या बैठकीला ‘हे’ नेते उपस्थित राहणार
या बैठकीला तृणूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासह अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. (Fifteen political parties will meet on Tuesday at Pawar's residence at 6 Janpath in Delhi)
मुंबई : भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी आज राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल 2 तास चर्चा केली. त्यानंतर पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथवरील निवासस्थानी मंगळवारी 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला तृणूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासह अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.