अखेर एकनाथ शिंदे हॉटेलच्या बाहेर आले; माध्यमांना दिली महत्त्वाची माहिती!
गेल्या आठ दिवसांपासून महाराष्टाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेले एकनाथ शिंदे यांनी आज अखेर पत्रकारांशी थेट संवाद साधला. गुवाहाटी येथील हॉटेलच्या बाहेर उपस्थित पत्रकारांशी ते स्वतः येऊन बोलले. दीपक केसकर हे आमच्या गटाचे प्रवक्ते आहेत आणि ते तुम्हाला वेळोवेळी आमची भूमिका स्पष्ट करीत आहेत, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. पुढची भूमिका लवकरच स्पष्ट करू असेही त्यांनी सांगितले. […]
गेल्या आठ दिवसांपासून महाराष्टाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेले एकनाथ शिंदे यांनी आज अखेर पत्रकारांशी थेट संवाद साधला. गुवाहाटी येथील हॉटेलच्या बाहेर उपस्थित पत्रकारांशी ते स्वतः येऊन बोलले. दीपक केसकर हे आमच्या गटाचे प्रवक्ते आहेत आणि ते तुम्हाला वेळोवेळी आमची भूमिका स्पष्ट करीत आहेत, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. पुढची भूमिका लवकरच स्पष्ट करू असेही त्यांनी सांगितले. दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्ली येथे दाखल झाले असून दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचा विश्वसनीय सूत्रांचा दावा आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी TV9 मराठीशी विशेष संवाद साधला. यात त्यांनी आजचा शेवटचा दिवस असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.
Published on: Jun 28, 2022 02:41 PM