निर्मला सीतारमण संसद परिसरात दाखल, थोड्याच वेळात अर्थसंकल्प मांडायला सुरुवात
आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसद परिसरात दाखल झाल्या आहेत. पाहा व्हीडिओ...
आजचा दिवस देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसद परिसरात दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात 11 वाजता निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडायला सुरुवात करतील. देशाचं लक्ष आज राजधानी दिल्लीकडे असेल. कोणत्या क्षेत्राला किती आणि काय मिळणार? याचीच चर्चा सध्या सर्वत्र होतेय. त्यामुळे आजच्या बजेटमध्ये उद्योग जगतासह सर्वसामान्य लोकांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Feb 01, 2023 10:04 AM