दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

| Updated on: Aug 07, 2023 | 1:15 PM

दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एम्स रुग्णालयातील एन्डोस्कोपी वॉर्डमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2023 | दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एम्स रुग्णालयातील एन्डोस्कोपी वॉर्डमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु आहेत. आग लागल्यामुळे एम्स रुग्णालयामध्ये एकच गोंधळ उडाला. रुग्णालयातील रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

 

Published on: Aug 07, 2023 01:15 PM
महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, संभाजी भिडे यांच्यावर विरोधात सुनावणी सुरू
मणिपूरच्या हिंसेवरून अरविंद सावंत आक्रमक, थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केला ‘हा’ सवाल