चंद्रपूरमध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग
बल्लारपूर तालुक्यातल्या कळमनामध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेले नाही.
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या कळमनामध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग रविवारी रात्रीच्या सुमारास लागली. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 बंबानी 350 हून अधिक फेऱ्या केल्या आहेत. मात्र अगीवर अद्यापही नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. या आगीत आतापर्यंत 50 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
Published on: May 23, 2022 09:34 AM