लातूरच्या वाढवणामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग, 6 एकरवरील ऊस जळून खाक

| Updated on: Feb 08, 2022 | 11:36 AM

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या वाढवणा  इथं  शॉर्टसर्किटमुळे  आग  (Fire) लागल्याने  सहा  एकरावरील ऊस (sugarcane) जळाला  आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या वाढवणा  इथं  शॉर्टसर्किटमुळे  आग  (Fire) लागल्याने  सहा  एकरावरील ऊस (sugarcane) जळाला  आहे ,  हळद-वाढवणा  येथील शेतकरी नारायण चव्हाण यांच्या शेतातील विद्युत खांबावर शॉर्ट-सर्किट झाल्याने उडालेल्या ठिणग्यांनी ऊस पेटला आणि बघता बघता ही आग सहा एकरावर पसरली . आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत आग पसरली होती . या आगीत कसलीही जीवित हानी झालेली नाही . जळालेला  ऊस कारखान्याने घ्यावा आणि शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे .

Published on: Feb 08, 2022 11:36 AM
‘जशी त्यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी…’ लता मंगेशकर यांच्यावर आंबेडकरांची टिप्पणी
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 8 February 2022