Akola | चायना मांजात अडकलेल्या घुबडाचे अग्निशामक विभागाच्या जवानांनी वाचवले प्राण

| Updated on: Feb 06, 2022 | 12:57 PM

अकोला (Akola) शहरातल्या जठारपेठमधील दिवेकर यांच्या आखाड्याजवळ एका पिंपळाच्या झाडावर एक घुबड (Owl) अडकले होते. चायना मांजा(Manja)त हे घुबड अडकल्याचे तेथील नागरिकांना दिसून आले.

अकोला (Akola) शहरातल्या जठारपेठमधील दिवेकर यांच्या आखाड्याजवळ एका पिंपळाच्या झाडावर एक घुबड (Owl) अडकले होते. चायना मांजा(Manja)त हे घुबड अडकल्याचे तेथील नागरिकांना दिसून आले. त्यांनी लगेच अग्निशामक विभागाला यासंबंधी कळवले. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 50 ते 60 फूट उंच असलेल्या घुबडाचे रेस्क्यू करून त्या घुबडाची चायना मांजातून सुटका केली. सुटका केल्यानंतर या घुबडाला वन विभागाच्या हवाली करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी जानेवारी-फेब्रुवारीच्या काळात पतंगबाजी केली जाते. यात चायना मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र हा चायना मांजा अत्यंत धोकादायक असून अनेक दुर्घटना यामुळे आधीही घडल्या आहेत. पक्षीच नाही तर अनेक माणसांनाही यामुळे इजा झाल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. आता घुबड यात अडकले होते.

Amravati | चिखलदरा परिसरात पुन्हा 2 बिबट्यांचं दर्शन, 3 श्वानांची शिकार
Nandurbar | साखर कारखान्यांकडून ऊस तोडणीला विलंब, शेतकऱ्यांमध्ये नाराजी