आधी लाठीचार्ज झाला? की दगडफेक झाली? जालन्यात नेमकं काय घडलं? पाहा tv9 चा स्पेशल रिपोर्ट
गृहखाते म्हणत की आधी दगडफेक झाली, मग लाठीचार्ज झाला. तर स्थानिकांच्या मते लाठीचार्ज आणि शेकडो पोलिसांच्या फौजफाटा तयारीनिशी गावात आल्यामुळे परिस्थिती बिघडली. मात्र, पोलिसांवर ही वेळ दगडफेकीमुळे आली का? आणि दगडफेकीची वेळ लाठीचार्जमुळे ओढावली का? या प्रश्नांचा उलगडा होणं महत्वाचं आहे.....
मुंबई : 3 सप्टेंबर 2023 | जालना येथे घडलेल्या प्रकारानंतर एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. लाठीचार्ज आणि दगडफेक या ज्या घटना घडल्या त्याचे अनेक व्हिडीओ वेगवेगळ्या दाव्यांनी सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओंमध्ये काय काय दावे आहेत. स्थानिकांचा दावा आहे की आधी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांसह कीर्तनासाठी जमलेल्या महिला-मुलांनाही मारहाण झाली. तर जखमी पोलीस म्हणतात की आधी लोकांनी दगडफेक आणि मिरचीची पूड फेकली. त्यानंतर आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. असाही एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात ही उंच वास्तू, दगडफेक ज्या बाजूनं झाली तो भाग, जिथं लाठीचार्ज झाला तो भाग आणि जिथं महिला होत्या तो भाग दिसत आहे. त्या व्हिडीओत काय दिसतं? तिथं नेमकं काय घडलं? हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट.
Published on: Sep 03, 2023 11:45 PM