‘आधी टेंभीनाक्यातून आणि आता नागपूरमधून, इलाका तुम्हारा धमाका हमारा’, सुषमा अंधारे पुन्हा कडाडल्या
भाजप म्हणजे भाड्याने घेणारी पार्टी, तुम्ही पक्ष फोडला. माणसे फोडली त्यामुळे सरकार अस्थिर झाले. इन्व्हेस्टमेंट बाहेर जायला लागली. देवा भाऊ म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही? काय झालं त्याचं?
नागपूर | 19 ऑक्टोंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा नागपूरमधून सुरु झाला. सुषमा अंधारे यांनी या यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील टेंभीनाक्यातून केली. आता दुसऱ्या टप्प्याची सुरवात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधून केलीय. नागपूर हा फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे असे मी मानतच नाही, असा अतोला त्यांनी यावेळी लगावला. देवा भाऊ हा मोठा अभ्यासू माणूस आहे असं वाटायचं पण तस झालं नाही. एक नारा आला होता, केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र मात्र झालं उलटंच. उद्धव साहेब यांच्यावर टीका करून काही लोक गेली. पण, त्यांच्या क्षेत्रात जाऊनही आम्ही कशासाठी गेले हे सांगितलं नाही. पवार साहेबांनी अनेक नेते घडविले, बाळासाहेबांनी अनेक नेते घडविले मग फडणवीस यांनी कोणाला घडविले हे मी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र एकही दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला.