Video : राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहीली यादी जाहीर, पाहा कोणाचा नंबर लागला
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. शरद पवार गटाने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने आपली लोकसभा-2024 उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वाट्याला आलेल्या मतदार संघातील उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. यात वर्धा- अमर काळे, दिंडोरी – भास्करराव भगरे, शिरुर- डॉ. अमोल कोल्हे, बारामती – सुप्रिया सुळे, अहमदनगर – निलेश लंके अशी नावे जाहीर करण्यात आली आहेत. ही पहिलीच यादी असून दुसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या यादीतून नेमके शरद पवार गटाच्या वाटाल्या किती मतदार संघ आले हे समजणार आहे. या यादीत वर्धा येथून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याने नितेश कराळे गुरुजी यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे.
Published on: Mar 30, 2024 08:44 PM