आधी मराठा आरक्षण मग इलेक्शन, ‘मी सुनील बाबुराव कावळे मुक्काम पोस्ट चिकणगाव…’
'आरक्षण भेटलंच पाहिजे. आपली परिस्थिती अशी आहे. आपले लेकरं शिकले तर काही होत नाही शिकून बी. माझा मुलगा आहे polytechnic ला number लागला. ते म्हणले, 'दादा हो आता polytechnic झाल्यानंतर engineering ला तुला आरक्षणच राहील', काय होता संवाद?
मुंबई | 19 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एका तरुणाने आपलं जीवन संपवलं. मुंबईच्या उड्डाणपुलावर पंचेचाळीस वर्षीय सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. मुळ जालन्यातील अंबडचे रहिवाशी असलेल्या कावळे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिलीय. अगोदर मराठा आरक्षण, मगच इलेक्शन असं त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलंय. महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता हिंदू धर्मरक्षक महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मी सुनील बाबुराव कावळे, मुक्काम पोस्ट चिकणगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना एकच मिशन मराठा आरक्षण. एक मराठा, लाख मराठा, साहेब आता कोणत्याच नेत्याच्या सभेला जायचं नाही. आता एकच मिशन मराठा आरक्षण. मला वाटलं मी केलं. मला मोठ्या मनानं माफ करा. मी क्षमा मागतो, सर्वांनी मला माफ करावं असं सुनील कावळे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. सुनील कावळे यांच्या जाण्यानं त्यांच्या घरी आक्रोश आहे. पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट….