Biperjoy Cyclone : अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता; कोकणातील किनारपट्टी जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jun 10, 2023 | 9:33 AM

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ‘बिपरजॉय’ नावाचे हे चक्रीवादळ तयार झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या मते, येत्या 24 तासांत या वादळाची स्थिती आणि दिशा स्पष्ट होईल.

Follow us on

मुंबई : मान्सूनपूर्वी ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार आहे. हे चक्रीवादळ मुंबई आणि कोकणच्या सागरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ‘बिपरजॉय’ नावाचे हे चक्रीवादळ तयार झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या मते, येत्या 24 तासांत या वादळाची स्थिती आणि दिशा स्पष्ट होईल. तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने कोकण किनारपट्टीवर वादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं आधीच दक्षता घेत मच्छीमारांच्या बोटी परत बोलावण्यात आल्या आहेत. तर 30-40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. यादरम्यान समुद्रात उंच लाटा उसळतील. अशा स्थितीत रत्नागिरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर, चार ते पाच दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.