शरद पवार यांनी फोटो न वापरण्यावरून तंबी दिल्यानंतर ही राष्ट्रवादीचा हा मंत्री ठाम, म्हणतो, ‘फोटो वापरणारच’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यापासून अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात आहे. त्यावरून शरद पवार यांनी यांच्याआधीच आपला फोटो वापरू नये असं बजावलं होतं. त्यानंतर ही अजित पवार गटाकडून त्यांचा फोटो वापरला जातच आहे.
नागपूर :17 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मोठ्या घडामोडी होत आहेत. शरद पवार यांनी देखील आपली भूमिका ठाम ठेवली आहे. तर शरद पवार यांनी अजित पवार गटाला आपला फोटो वापरू नये असे आधीच ठणकावलं होतं. मात्र यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात आहे. त्यावरून शरद पवार यांनी थेट अजित पवार गटाला आता इशाराच दिला आहे. तर आपला फोटो वापरला तर न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे. यावरून अन्न व औषधी मंत्री तथा अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाब आत्राम यांनी यावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. आत्राम यांनी, शरद पवार हे आमचे गुरू आहेत. त्यांचा फोटो हा वापरणाच अशी भूमिका घेतली आहे. तर त्यांनी न्यायालयात गेल्यास त्यावर काय निर्णय येतो ते पाहिलं जाईल. तर आम्ही फोटो वापरणारच असेही त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Aug 17, 2023 10:45 AM