सभेला हजर राहण्याचे आदेश असलेलं ‘ते’ पत्र बनावट; शिंदे गटाचा खुलासा
मुख्यमंत्र्यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेबाबत सध्या एक पत्र व्हायरल होत आहे. हे पत्र बनावट असल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई : 12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वी एक पत्र व्हायरल झालं आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. या पत्रावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. वाद निर्माण झाल्यानंतर आता या पत्राबाबत शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हे पत्र बनावट असून, बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे.
Published on: Sep 11, 2022 09:13 AM