किसान सभेच्या मोर्चावर बोलताना अनिल बोंडे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप; पाहा…
आपल्या विविध मागण्या घेऊन शेतकरी आणि कष्टकरी लाँगमार्च घेऊन मुंबईच्या दिशेने येत आहेत. त्यावर राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
नवी दिल्ली : विविध मागण्यासाठी शेतकरी आणि कष्टकरी आपला लाँगमार्च घेऊन मुंबईच्या दिशेने येत आहेत. त्यावर राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनामागे राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांचा हात आहे. अमोल मिटकरी यांची कृती म्हणजे बुडत्याला काडीचा आधार आहे, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तेंव्हा पण किसान मोर्चा निघाला होता. तेव्हा फडणवीस यांनी त्यांना सन्मान दिला होता. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका शेतक-यांच्या बाजूने आहे. यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी पंचामृत आहे. सामान्यांसाठी पंचामृत आहे. पण विरोधकांसाठी विष आहे. त्यामुळे हा घोट कसा घ्यावा हा प्रश्न त्यांना आहे, असं अनिल बोंडे म्हणालेत.
Published on: Mar 13, 2023 12:44 PM