हसन मुश्रीफ निर्दोष असतील तर त्यांनी चौकशीला सामोरं जावं, कारण…; भाजप खासदाराची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 13, 2023 | 1:21 PM

खासदार अनिल बोंडे यांनी ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच राष्ट्रवादीवरही त्यांनी टीकास्त्र डागलंय. पाहा...

नवी दिल्ली : भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राष्ट्र्वादी पक्षावर तसंच आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी ही भ्रष्टवादी पार्टी आहे. हसन मुश्रीफ निर्दोष असतील तर त्यांनी ईडीच्या चौकशीला सामोरं जावं. दूध का दूध पानी का पानी होईल. त्यांनी सामान्य जनतेला पुढे करू नये, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. अनिल बोंडे यांनी शिवसेनेच्या ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. आपलं ठेवायचं झाकून दुस-याचं पाहायचे वाकून, असं संजय राऊत यांनी करू नये. सत्ताधा-यांसोबतच विरोधकांवर कारवाई झाली तर बोंब मारू नका. संजय राऊत व्हिसलब्लोअर होत असतील तर स्वागत आहे, असंही बोंडे म्हणालेत.

 

Published on: Mar 13, 2023 01:19 PM
‘थेट कागलमध्ये येत मुश्रीफ म्हणाले, मी त्यांना ….’
आधी 500 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप, आता जप्तीची कारवाई? राहुल कुल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता