माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे यांच्या भेटीला, काय झाली चर्चा

| Updated on: Aug 22, 2024 | 5:54 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीला आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जालनातील आंतरवाली सराटीत आले होते. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयी विविध तर्कविर्तक केले जात आहेत.

Follow us on

मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालनातील आंतरवाली सराटीत पोहचले आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी कालच मराठा समाजाची बैठक रद्द झाल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्यात आल्याने मराठा समाजाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेऊन राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. मात्र, या चर्चेचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.पृ्थ्वीराज चौहान हे कॉंग्रेसमधील स्वच्छ चारित्र्य असलेले नेते असून ते राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी फाईलवर सह्या करण्यावरुन झालेला वाद चांगलाच गाजला होता.त्यावेळी फाईलवर सह्या करीत नसल्याने त्यांच्यावर टिका करताना त्यांच्या विरोधकांकडून ‘धोरण लकवा’ अशी टर्म वापरली जात होती. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीच्या राजकारणात मुरलेले नेते होते. त्यांना कॉंग्रेस पक्ष श्रेष्टींनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवविले होते.